भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या भूमिकेमुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचे ‘ते’ स्वप्न भंगणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत मोठ्याप्रमाणात भाजपला यश मिळाले. यात शिवसेनेचाही सिंहाचा वाटा होता. शिवसेनेने लोकसभेत हो नाही म्हणत भाजपशी अखेर समेट केली होती. तेव्हा शिवसेनने केंद्रात तुम्ही आणि राज्यात आम्हीचा फॉर्म्युला केला होता. लोकसभेतील मिलाप हा विधानसभेच्या अनुशंगानेच होता. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेला मानाचे स्थान मिळणार यावर शिवसेनेचा विश्वास होता. मात्र आता या विश्वासाला गालबोल लागण्याची शक्यता आहे. दिल्लीत नवनिर्वाचित गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत भाजप शिवसेनेच्या विरोधात जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेना संकटात सापडल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या कोअर टीमसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी शिवसेना भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब केलाच, परंतू पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करा, असं म्हटलं. त्यामुळे शिवसेनेचे राज्यात सत्ता स्थापन करण्याचे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न भंगणार, असं वाटत आहे. कारण पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी भाजपनं रणशिंग फुंकलं आहे.

ज्याप्रमाणे मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जागांचा विचार केला नाही, त्याच पद्धतीने राज्यात मुख्यमंत्री आपला असावा यासाठी शिवसेना आणि मित्र पक्षाच्या जागा कशा निवडून येतील यासाठी काम करा, असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. अमित शहांनी घेतलेल्या भुमिकेमुळे शिवेसेनेवर काय परिणाम होतील. किंवा शिवसेना विधानसभा निवडणुकांना काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी आगामी विधानसभा निवडणूक आणि संघटनात्मक निवडणुकांबाबत ही चर्चा होणार आहे. आम्ही सध्या विधानसभा निवडणुकीच्या मोडमध्ये आहोत. महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारही होणार आहे पण प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार आहे की नाही या संदर्भात केंद्रीय निवडणूक समिती निर्णय घेण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलं.

आरोग्यविषयक वृत्त –

दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम

चेस्ट आणि अंडरआर्मचे केस काढण्यापूर्वी घ्या ‘ही’ काळजी

इरेक्शनची समस्या अशी सोडवा, घ्या शरीरसुखाचा आनंद

राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय ; जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही

Loading...
You might also like