निवडणुकीत वारे बदलले, आमदाराची वाट बिकट

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीत प्रचाराला गती आली असून प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. शिरुर विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत होत असून हवेलीतील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीमध्ये मोठी उलथापालथ झाली असून एकेकाळी आमदार बाबुराव पाचर्णे यांना मताधिक्य देणार्या प्रितम गायकवाड यांनी यावेळी भूमीका बदलत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांना मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार केला आहे.

शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात यावेळी काटेकी टक्कर पहावयास मिळत असून प्रत्येक उमेदवार आपल्या पारड्यात जास्तीत जास्त मत कसे पडतील यासाठी प्रयत्नात आहेत. हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर सर्व मतदार संघाचे लक्ष लागले असून लोकसंख्येने अधिक असलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत परिसरात भाजपला मताधिक्य मिळवून दिले.परंतु गेल्या दोन दिवसात या परिसरात नाटकीय बदल झाले असून प्रीतम गायकवाड यांनी आपली भूमिका बदलत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करण्याचे ठरविले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांना मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार केला आहे आणि यामध्ये जर आपण कमी पडलो तर राजकारणातून संन्यास घेऊ असे गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले.

सध्या हवेलीतील अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र असून कोण बाजी मारेल यावर पैजा लावल्या जात आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी