जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांचे दिवस भरले, दौंडला प्रगत तालुका बनविण्याची धमक फक्त राहुल कुल यांच्यामध्येच : गिरीश बापट

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – जातीपातीचे राजकारण करून समाजातील प्रत्येक घटकामध्ये भांडणे लावणाऱ्यांचे दिवस आता भरले असून या लोकांना जनतेने पाय उतार केल्याने आता त्यांची जादू ओसरली आहे अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नाव न घेता केली. यावेळी बोलताना त्यांनी गेल्या ५० वर्षांमध्ये जितका निधी तालुक्याला आला नाही तितका १४४० कोटी रुपयांचा निधी फक्त ५ वर्षांमध्ये एकट्या राहुल दादांच्या माध्यमातून आला आहे. त्यामुळे दौंडला महाराष्ट्रातील प्रगत तालुका बनविण्याची धमक फक्त राहुल दादांमध्येच असून त्यांना आता पुन्हा एकदा दौंडच्या जनतेने भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले. ते भाजप, रासप, आरपीआय महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवाजी चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

Girish Bapat
बापट यांनी पुढे बोलताना राहुल कुल यांनी केलेल्या पाठ पुराव्यामुळे १५० वर्षे जुना आणि ६० वर्षांपासून बंद पडलेला बेबी कॅनॉलला दौंडमध्ये पाणी आणण्यास यश आले. कारखाना वाचवण्यासाठी राहुल कुल हे रात्री २-२ वाजता मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटत होते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले असून मी राहुल कुल यांनी मागणी केलेल्या लोणावळा-पुणे-दौंड ही लोकल लवकरच सुरू व्हावी यासाठी स्वतः लक्ष घालणार आहे. कुल यांनी सुचवलेल्या चौफुला जवळील एमआयडीसीचे काम प्रगती पथावर असल्याचे सांगत सुप्रिया सुळेंनी ३७० कलम बाबत आपली नेमकी भूमिका का स्पष्ट केली नाही याबाबत ही प्रश्न उपस्थित केला.
यावेळी मंत्री महादेव जानकर यांनी बोलताना आम्ही कधी मुलगी आणि पुतण्यापूरते राजकारण करत नाही तर सर्वांना बरोबर घेऊन विकास साधण्याचा प्रयत्न करत असतो. मला तर मुलगीही नाही आणि पुतण्याचा काही संबंध नाही आम्ही फक्त विकास कसा होईल हेच पाहतो असा टोमणा शरद पवार यांचे नाव न घेता लगावला. राहुल कुल यांच्या संपूर्ण ताकदीनिशी सर्वच समाज घटकांनी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

धनगर आरक्षणावर त्यांनी बोलताना आरक्षणाचा तिढा ९०% सुटला असून समाजाला न्याय देण्याचे काम हे खऱ्या अर्थाने भाजप सरकारने केले असल्याचे सांगितले. यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या काळामध्ये करण्यात आलेल्या १४४० कोटींचा लेखाजोखाच जनतेसमोर मांडला आणि त्यांनी मागे केलेल्या आवाहानानुसार जर मी चारपट कामे केली नाही तर उमेदवारी अर्ज भरणार नाही. ती कामे झाली म्हणून मी उमेदवारी अर्ज भरला असून विरोधकांना जर माझ्या कामावर शंका असेल तर त्यांनी कधीही समोर बसावे असे आवाहन केले आणि दौंडवर काही मंडळींनी वेळोवेळी अन्याय केला आणि या तालुक्याला कधीच मंत्रिपद मिळू दिले नाही आणि लोकसभेसाठी या तालुक्याला कधी लायक समजले नाही. पण भाजप आणि महायुतीने दौंडला लोकसभा तिकीट दिले यावरून आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला त्यामुळे आम्ही जेथे राहू तेथे इमानदारीने काम करतो ही आमची संस्कृती आहे असे सांगितले.

daund

यावेळी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले राजाभाऊ तांबे यांनी दौंड राष्ट्रवादी मध्ये काही जणांची एक टोळी आहे आणि त्या टोळीने लोकांचा फक्त वापर केला आहे त्यामुळे अश्या टोळीपासून मी दूर होऊन तालुक्यासाठी अहो रात्र झटणाऱ्या आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला असून मी स्वतःला त्यांच्या सारखा दूरदृष्टी नेता मित्र म्हणून मिळाल्याने आपले भाग्य समजतो असे सांगितले. या कार्यक्रमाला खा.गिरीश बापट, पदुम मंत्री महादेव जानकर, आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना ताई कुल, प्रेमसुख कटारिया, राजाभाऊ तांबे, वासुदेव काळे, हरीश खोमणे, नागसेन धेंडे, कांचन कुल यांसह बापू भागवत शिवसेनेचे अनिल सोनवणे हे उपस्थित होते. आमदार राहुल कुल यांचा उमेदवारी अर्ज भरताना दौंड तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्याप्रमाणावर जनसमुदाय जमला होता.

visit : Policenama.com