21 ऑक्टोबरला सुट्टी दिली नाही तर कर्मचारी ‘इथं’ करू शकतात तक्रार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. 21 ऑक्टोबर (सोमवारी) राज्यात मतदान होणार आहे. या दिवशी सर्वांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जाताना दिसत आहेत. सर्व स्तरांतून मतदान करण्यासाठी लोकांना जागरुक केले जात आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सर्वांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

इतकेच नाही तर ही सुट्टी पगारी असणार आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे की, जी कार्यालये कर्मचाऱ्यांना सुट्टी देणार नाही त्यांच्यावर दंडाची कारवाई केली जाईल. शासनाने यासंदर्भात 25 सप्टेंबर रोजी परिपत्रकंही काढलं आहे. काही कंपन्यांना अपवादात्मक परिस्थितीत सुट्टी देणं जमतंही नाही. अशावेळी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी सुट्टी द्यायला जमणार नसेल तर किमान 2-3 तास भरपगारी सवलत देणं गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांना ही सवलत देणंही शक्य नसेल तर त्या कर्मचाऱ्यांना जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करता येणार आहे.

कामगार आयुक्तांनी त्यांच्या आदेशात दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका व त्यांच्या अधिपत्याखाली महानगरपालिकेतील प्रभागनिहाय कार्यालयांमध्ये तक्रार दाखल करता येणार आहे. याशिवाय राज्याचे कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, सी-20, ई-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे, मुंबईतही तक्रर दाखल करता येणार आहे.