हुल्लडबाज कार्यकर्त्यांमुळे आ. जगतापांना मोठा धक्का ! माजी महापौर अभिषेक कळमकर शिवसेनेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आज रात्री पावणेआठ वाजता झालेल्या या प्रवेशामुळे नगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कळमकर यांचा हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शहरातील मतदारसंघातील उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना मोठा धक्का मानला जात आहे.
shivsena

आमदार जगताप यांच्या हुल्लड कार्यकर्त्यांमुळेच माजी महापौर अभिषेक कळमकर हे गेल्या काही दिवसांपासून जगताप यांच्यावर नाराज होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेनंतर कळमकर यांना जगताप समर्थकांनी मारहाण करून गुंडगिरी केली होती. तेव्हापासून कळमकर यांची नाराजी अधिक तीव्र झाले होती. त्यामुळे जगताप हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या संपर्कात होते. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत त्यांनी हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना मोठा धक्का बसला आहे. जगताप समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे.

अभिषेक कळमकर यांचे चुलते माजी आमदार दादाभाऊ कळमकर हे शरद पवार यांच्या अतिशय विश्वासू मानले जातात. ते रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे चेअरमन आहेत. तरीही अभिषेक कळमकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यामुळेच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.

You might also like