अजित पवार ‘कुठं-कुठं’ नाचतात हे सांगितलं, तर ‘हुंदका’ आवरता येणार नाहीेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – हलगीच्या तालावर झिंगाट झालेल्या ‘नाच्या’च्या शब्दावर विश्वास ठेवू नका. सारखे-सारखे कुंकू बदलणारे तुमच्याशी प्रमाणिक काय राहणार अशी टीका अजित पवार यांनी लक्ष्मण ढोबळे यांच्यावर केली होती. यावर प्रत्युत्तर देताना, मी पक्षाचा झेंडा घेऊन नाचतोय, पण तुम्ही कुठे कुठे नाचता हे मला सांगायला लाऊ नका. जर तुमच्याबद्दल मी तोंड उघडले तर अश्रू आवरण्याचा विषय राहणार नाही. हुंदकादेखील आवरता येणार नाही, असे ढोबळे यांनी म्हटले आहे.

आज अश्रूची झाली फुले हे नाटक घेऊन अजित पवार शिखर बँकेत केलेल्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी अनावर झालेले डोळ्यातील अश्रू पुसत आले, आणि माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याबद्दल वाईट बोलले. काटेवाडीत वाढल्यामुळे राज्यात काटे घेवूनच ते फिरतात अशी टीका ढोबळे यांनी अजित पवार यांच्यावर केली. पवार साहेबांचे पुतण्या म्हणून मी तुमचे लाड केले. सांभाळून घेतलंय त्यामुळे मला तुम्ही लहानच आहात. सध्या तुमचा टीआरपी घसरलाय, असे देखील त्यांनी अजित पवारांना सुनावले.

पवार घराण्यावर बोलताना लक्ष्मण ढोबळे म्हणाले, महाराष्ट्र घडवडला वाडवला मोठा केला पवार घराण्यानं. पण, तुम्ही त्याची घडीच विस्कटली आणि साऱ्या राजकारणाचें वाटोळं केलं. शेतकऱ्यांचा राजवाडा असलेली बँक मातीत घातली. अन आता शेतकऱ्यांबद्दल खोटा कळवळा दाखवताय, तरी आम्ही हे निमूटपणे सहन करत असल्याचे म्हटले.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या