कोथरूडला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी ताकदवान माणसाच्या पाठीशी उभे रहा : शिक्षणतज्ञ डॉ. अ.ल. देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याचे नाव परिचित आहेच, कोणत्याही शहराच्या विकासाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणजे ताकदवान राजकीय नेतृत्व असते. त्यामुळेच कोथरूडला देशपातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी कोथरूड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी विचारवंतांनी-शिक्षकांनी उभे राहिले पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी शिक्षक संघ कोथरुड आणि चंद्रकांत पाटील मित्र परिवार यांनी आयोजित केलेल्या शिक्षक मेळाव्यात बोलताना केले.

अध्यक्षस्थानी माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार होते. कोथरूड परिसरातील शालेय शिक्षकांच्या मेळाव्यास पुणे महानगर शिक्षण समूह प्रमुख धनंजय काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत पाटील मित्र परिवाराच्या वतीने अ‍ॅड. धर्मराज सुतार आणि राहुल अमृतकर यांनी केले. प्रास्ताविक संध्या देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन अजित वाराणशीकर यांनी केले. तर आभार स्वाती जोशी यांनी मानले. रामबाग कॉलनीतील न्यू इंडिया स्कूल मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. देशमुख आपल्या भाषणात म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे जसा बारामतीचा आणि आणि दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यामुळे प्रवरानगरचा जसा विकास झाला. या शहरांची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. त्याच धर्तीवर यापुढील काळात चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे कोथरूडची नोंद देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल.

कोथरूडच्या पायाभरणीत माजी मंत्री शशिकांत भाऊ सुतार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यावर इमारत चढवण्याचे काम आ. मेधाताई कुलकर्णी यांनी केले आहे. त्याला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार यांनी आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावातील कार्यकर्ता आणि साधेपणा उपस्थित शिक्षक बंधू भगिनींना उलगडून सांगितला. ते म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील हा एक अत्यंत थोड्या गरजा असलेला सामान्य कार्यकर्ता आहे. आपले आयुष्य देशाला अर्पण केलेली व्यक्ती आहे. मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाची मंत्री असताना मलबार हिल सारख्या ठिकाणी कोणताही बंगला मिळू शकत असताना मंत्रालया समोरील छोट्या निवासात राहतो, असा उमेदवार मिळणे म्हणजे कोथरूडकरांचे आपले भाग्यच आहे. त्यामुळे देशावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामामुळे देशाची मान उंचावलेली आहेच.

पुणे महानगर शिक्षण समूह प्रमुख धनंजय काळे म्हणाले की, यंदाची विधानसभा निवडणूक आपल्या पुढील पिढीचे भवितव्य घडवणारी आहे. राजकीय कारणांची नाही. या संक्रमण काळाचे भागीदार आणि साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे शंभर टक्के मतदान होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. मतदानात नोटाचा वापर होऊ नये यासाठीही आपण प्रयत्न करावेत असे आवाहन धनंजय काळे यांनी केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी