नागरिकांचा आणि विशेषत: महिला वर्गाचा भरघोस पाठींबा, माझा विजय निश्‍चित : मुक्ता टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रचाराची पहिली फेरी पुर्ण झाली आहे. नागरिकांचा आणि विशेषत: महिला वर्गाचा भरघोस पाठींबा मिळत आहे. भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते झोकून देउन काम करत असून माझा विजय निश्‍चित आहे असा विश्‍वास भाजप- शिवसेना- रिपाइं (आठवले) महायुतीच्या कसबा मतदार संघातील उमेदवार महापौर मुक्ता टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

याप्रसंगी शिवसेनेचे समन्वयक राजेंद्र शिंदे, रिपाइंचे मंदार जोशी, भाजपचे मतदार संघाचे अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे, हेमंत रासने, धीरज घाटे याप्रसंगी उपस्थित होते. टिळक म्हणाल्या, की शहराच्या मध्यवर्ती भागातील जुने वाडे आणि वाहतुकीचा प्रश्‍न अत्यंत महत्वाचा आहे. माजी मंत्री कसबा मतदारसंघाचे खासदार गिरीष बापट यांनी जुन्या वाड्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी चांगला पाठपुरावा केला आहे. त्याला यशही आले असून लवकरच वाड्यांच्या पुर्नवसनाचा मार्ग मोकळा होईल. वाड्यांमध्ये स्वच्छतागृह बांधण्यास कायदेशीर अडचणी येत होत्या. बापट यांनी वाड्यांमध्ये स्वच्छतागृह बांधण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळविली. एवढेच नव्हे तर अनेक वाड्यांमध्ये स्वच्छतागृहही बांधून दिली.

शहरात वाहतुकीची कोंडी हा महत्वाचा प्रश्‍न असून डीपीतील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी प्लॅन तयार करण्यात आला आहे. तसेच पथारी व्यवसायिकांचे योग्य पुर्नवसन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पार्किंगचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आरक्षित जागांवर पार्किंग उभारण्यात येणार आहे. भाजपने शहरात मेट्रोचे काम सुरू केले असून येत्या काळात एचसीएमटीआर मार्गिकेचेही काम सुरू होईल. यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे. नदी सुधार प्रकल्पाचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. शहरातील बाजार पेठ परिसरात एक कि.मी. परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

अलिकडे मंडई आणि अन्य एका ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह सुरू करण्यात आले आहे. महापौर म्हणून काम करताना महिला सक्षमीकरणासाठी आणि शहराच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांचे आणि उपाययोजनांना जनतेकडून चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. विशेषत: महिला वर्गाकडून आणि सर्वच समाजाच्या बांधवांकडूनही चांगला पाठींबा मिळत असल्याचे टिळक यांनी नमूद केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी