विधानसभा 2019 : MIM चे औरंगाबादमधील 3 उमेदवार जाहीर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली असून पितृपक्षामुळे महाराष्ट्रीतील राजकीय हालचाली मंदावल्या आहेत. पितृपक्ष संपल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येणार असून प्रमुख पक्षांकडून आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. वंचित आणि एमआयएम यांच्यातील युतीमध्ये फुट पडल्यानंतर एमआयएमने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये औरंगाबाद मधील 3 जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

एमआयएमने काही दिवसांपूर्वी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत मुंबईतील पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. यामध्ये वांद्रे पूर्वमधून मोहम्मद सलीम कुरेशी, कुर्ला विधानसभा मतदारसंघातून ज्ञानू डावरे, अणुशक्तीनगरमधून शाहवाज सरफराज हुसेन शेख, भायखळ्यातून आमदार वारिस पठाण, तर अंधेरी पश्चिममधून अरिफ मोईनुद्दीन शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबईतील उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता औरंगाबाद येथील तीन उमेदवारांची नावे घोषीत करण्यात आली आहेत. खासदार इम्तियाज जलील हे लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर एमआयएमने नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद पूर्वमधून गफार कादरी यांना उमेदवारी देण्यात आली. तर औरंगाबाद पश्चिम मधून अरुण बोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com