1990 ला बाळासाहेब ठाकरे भाजपा नेत्यांना म्हणाले होते 288 पैकी 88 जागा देईल, आता यावर चर्चा नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभेचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्ष आपले गाऱ्हाणे घेऊन मतदारांकडे मतदानासाठी धाव घेत आहेत. राज्यात युती विरोधात आघाडी अशी जोरदार लढत पहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभेला सर्वच पक्ष वेगळे लढले होते. मात्र यावेळी सेना-भाजप युतीमध्ये लढताहेत. शिवसेनेला 288 पैकी 124 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सध्या भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेबाबत विचारही करू शकत नव्हता.

एका इंग्रजी वृत्तपत्रातील लेखात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 1990 च्या युती बद्दलचा एक क्षण सांगितला आहे. ते म्हणतात 1990 साली जेव्हा बाळासाहेबांनी भाजपच्या काही नेत्यांना युती बाबतची बोलणी करण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यावेळी दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि इतर पदाधिकारी याबाबतची बोलणी करण्यासाठी गेले होते.

यावेळी चर्चेदरम्यान बाळासाहेबांनी भाजपच्या नेत्यांना 288 पैकी 88 जागा देतो असे सांगितले होते आणि यावर आता कोणतीही चर्चा होणार नाही असे देखील स्पष्ट केले होते. त्यानंतर प्रमोद महाजन आणि प्रकाश जावडेकर यांनी 88 जागांची यादी दिली होती आणि बाळासाहेबांनी देखील ती मान्य केली होती. यावेळी राज्यात भाजपचे 88 पैकी 85 उमेदवार निवडून आले होते.

बाळासाहेबांचा असलेला दरारा आणि त्यांनी बांधलेली मजबूत शिवसेना त्यावेळी मोठ्या भावाच्या भूमिकेत स्पष्ट दिसत होती. मात्र २०१९ च्या या विधानसभेला परिस्थिती बदलली आहे. सध्या बाळासाहेब सुद्धा हयात नाहीत त्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेली शिवसेना काहीशी बॅकफूटवर गेलेली दिसते आणि साहजिकच सध्या मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजप लोकांसमोर जात आहे. भाजपच्या अडवाणींनी शिवसेना राम आणि आम्ही लक्ष्मण असा उल्लेख केला होता मात्र सध्या फक्त शिवसेनेचे नेतेच आम्ही मोठा भाऊ असल्याचे म्हणत आहेत.

युती असूनही अनेकदा उद्धव ठाकरेंना भाजपवर टीका करावी लागते मात्र या विधानसभेनंतर चित्र एकदम स्पष्ट होणार आहे कोण मोठा आणि कोण छोटा भाऊ याचा निर्णय जनताच मतदान रूपातून करून देणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी