उस्मानाबाद : शेवटच्या संधीच्या नावाखाली आ. चव्हाणांकडून मतदारांची फसवणूक

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून संपूर्ण जिल्हा आज त्यांच्याकडे विकासाच्या नजरेने पाहतो. त्यात तुळजापूर मतदार संघात पाचवेळा आमदारकी उपभोगली. त्यात आघाडीची सत्ता असताना मंत्रीपदेही भोगली. मात्र मतदार संघातील शेतकरी, शेतमजूर यांच्या जिव्हाळ्याचा असलेला तुळजाभवानी कारखाना, सुतगिरणी बंद आहे. त्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे निवडणूक लढविताना त्यांनी मला शेवटची संधी द्या, असे मतदारांना मागील सलग तीन पंचवार्षिक निवडणूकीत साद घालत आले आहेत. त्यास मतदारही भावनिक होऊन बळी पडले. पुन्हा या निवडूकीत ते तीच पुनरावृत्ती करत आहेत. त्यामुळे जनतेची फसवणूक करणार्‍या या आमदाराला आता जनता धडा शिकवणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

मागील पाच निवडणुकांत विजयी सलामी देत आमदार राहिलेले आणि माझी ही शेवटची निवडणूक आहे, मलाच संधी द्या म्हणत दोन निवडणुका जिंकणारे तुळजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार मधुकर चव्हाण यावेळीही खोषा खवून रिंगणात उतरले आहेत. 84 वर्षे वय असूनही ‘अभी तो मै जवान हुं’ म्हणत पुन्हा एकदा शेवटची संधी द्या, या भावनिक आवाहनासह न केलेल्या विकास कामांचा पाढा वाचत मतदार संघात फिरत आहेत. मात्र यावेळी त्यांच्यासमोर अनेक दिग्गजांचे तगडे आव्हान आहे. सलग पाचवेळा आमदार राहिलेले चव्हाण यांनी मतदार संघात कोणतेही मोठे काम केले नाही. एखादा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न केला नाही. त्यामुळे या भागातील विशेषत: तुळजापूर मतदार संघातील मजूरांना रोजगारासाठी पुणे, मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे अनेक वर्षे सत्ता भोगूनही मतदारावर कोणामुळे ही वेळ आली. याबाबत मतदारांतून संतप्त प्रक्रिया येत आहेत.

केवळ मिळणार्‍या आमदार निधीचे वाटप करत मी हे केले, तुमच्या गावाला येवढा निधी दिला असे सांगत मतदारांना मताची साद घालत आहेत. पण वाटप केला गेलेला आमदार निधीही टक्केवारी घेऊनच दिला गेल्याचे त्यांचेच कार्यकर्ते चर्चा करताना दिसतात. गावागावात फिरताना लोकही त्यांच्या सततच्या त्याच बोलण्याला कंटाळले असल्याचे नागरिक सांगतात. त्याचाच आघाडीमध्ये बिघाडी करत भाजपात दाखल झालेले राणाजगजितसिंह पाटील हे त्यांना तगडे आव्हान देणार असे जनतेतून सूर निघत आहे. आ. चव्हाण यांच्याशी हाडवैरी असलेले नळदुर्गचे अशोक जगदाळे, तुळजापूरचे देवानंद रोचकरी यांनी त्यांना चीतपट करण्याचे शपथ घेतल्याचे समजते. जगदाळे स्वतः निवडणूक रिंगणात उतरले असून प्रत्येकवेळी निवडणुकीसाठी उभा टाकणारे रोचकरी मात्र यावेळी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला सहकार्य करताना दिसत आहेत.

हे थोडे कि काय त्यांच्याच तालुक्यातील लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे हे सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाकडून उभे ठाकले आहेत. मतदार संघावर आपले प्रभुत्व असावे यासाठी त्यांनी स्व:पक्षासह मित्र पक्षालाही भूतकाळात अडचणीत आणले असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच त्यांनी दोन वेळा लोकसभेच्या निवडणुकीत आघाडी धर्म न पाळता मित्र पक्षाच्या उमेदवाराला अप्रत्यक्षपणे पाडण्याचे काम केले असे सर्वसामान्य जनता चर्चा करताना दिसते. यावेळी त्यांना त्यांचाच तालुक्यातून तगडे आव्हान असल्याने अडचणीत आले आहेत. दरवेळा मत विभाजनात निवडून येणारे चव्हाण यावेळी मत विभाजानामुळे धोक्याची घंटा वाचत आहे.

Visit : Policenama.com