विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडून मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांची पाहणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज पुणे शहर परिसरातील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेऊन काही सूचना केल्या. यावेळी विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजय चव्हाण उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर यांनी कोरेगाव पार्क येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील गोडाउन, खडकी रेल्वे स्टेशन येथील माता रमाबाई आंबेडकर प्राथमिक शाळा, चिखलवाडी येथील कोठार, खडकी लोहमार्ग येथील पोलिस वसाहत, शिवाजीनगर येथील नरवीर तानाजी प्राथमिक शाळा आदी मतदान केंद्रांना भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी मतदानाच्या वेळी असणाऱ्या व्यवस्थेची माहिती घेतली. त्याबरोबरच मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठीचे रॅम्पची सुविधा उपलब्ध असल्याबाबतची खात्रीही त्यांनी केली. डॉ. म्हैसेकर यांनी शिवाजीनगर येथे दिव्यांग मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी