पुणे : पुरंदर विधानसभेसाठी २४ उमेदवारी अर्ज

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे)  – २०२ पुरंदर विधानसभा मतदार संघातून दि. २४ सप्टेंबर पासून दि. ४ ऑक्टोबर पर्यंत एकूण २४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.

उमेदवाराचे नाव, पक्ष पुढीलप्रमाणे :- डॉ. उदयकुमार वसंतराव जगताप (अपक्ष), संजय चंद्रकांत जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), चंदन विनायक मेमाणे (अपक्ष), विजय सोपानराव शिवतारे (शिवसेना), महादेव साहेबराव खेंगरे (अपक्ष), विनस उर्फ व्हीनस विजय शिवतारे (शिवसेना), रमेश महादेव उरवणे (अपक्ष), दिलीप सोपान यादव (अपक्ष), किरण बापू सोनवणे  (बहुजन समाज पार्टी), मनोहर निवृत्ती शेवाळे (संभाजी ब्रीगेड पार्टी), अतुल महादेव नागरे (वंचित बहुजन आघाडी), गिरीश बापूसाहेब जगताप (भारतीय जनता पक्ष), गणपत शंकर दगडे (भारतीय जनता पक्ष), सुरेश बाबुराव वीर (अपक्ष), बाळासाहेब बबन झिंजुरके (अपक्ष), ज्ञानेश्वर तुकाराम कटके (अपक्ष), प्रमोद संजय दिवेकर (अपक्ष), गणपत शंकर दगडे (अपक्ष), नवनाथ चंद्रकांत माळवे (बहुजन मुक्ती पार्टी), उमेश नारायण जगताप (मनसे).

यात काँग्रेसचे संजय जगताप यांनी चार तर शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दि. ७ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख आहे.

visit : Policenama.com