उद्धव ठाकरे मोठे बंधू, राज ठाकरे म्हणजे मनोरंजन आणि फक्त मनोरंजन : मिसेस CM

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची एका वृत्तवाहीनेने मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणजे मनोरंजन… मनोरंजन… मनोरंजन असे उत्तर देत राज ठाकरे यांना टोला लगावला.

तर उद्धव ठाकरे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मिसेस फडणवीस म्हणाल्या, उद्धव ठाकरे हे मोठ्या बंधु समान आहेत. यावेळी त्यांनी इतर पक्षातील नेत्यांविषयी त्यांचे मत विचारण्यात आले. शरद पवार यांच्याविषयी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, शरद पवार हे या वयात देखील काम करत आहेत. त्यांच्याविषयी गाण्यातून सांगायचे झाले तर ‘अभी तो मै जवान हूँ’ हे गाणे त्यांना सूट होते. अमृता फडणवीस यांनी मागील महिन्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्याविषयी मत व्यक्त करतना मोदी हे राष्ट्रपिता असल्याचे म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यावरून वाद झाला होता. मात्र, त्या आजही त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत.

अमृता फडणवीस यांना त्याचे पती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी मत व्यक्त करण्यास सांगितले असता त्यांनी देवेंद्र फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ असल्याचे मत व्यक्त केले. देवेंद्र यांना आम्ही घरात पहात नाही. आमच्यासाठी ते मिस्टर इंडिया आहेत. मागील महिन्यामध्ये काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख नाना पटोले यांनी फडणवीस यांनी आपल्या पत्नीची अ‍ॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. तर मुंबई-गोवा क्रूझ शिपवरील सेल्फीमुळेही अमृता फडणवीस वादात सापडल्या होत्या.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी