कोथरुडकरांना फक्त निवडायचं आहे की आमदार ‘कोथरुड’चा हवा की ‘बाहेरचा’, राज ठाकरेंची चंद्रकांत पाटलांवर टीका (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आज पुण्यात कोथरुड मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर कडाडून टीका केली. राज ठाकरे म्हणाले की सातारा, कोल्हापूरात पूर आला आणि त्याबरोबर हे इकडे वाहून आले. कोथरुडची निवडणूक सोपी आहे, कोथरुडकरांना फक्त ठरवायचे आहे की आपला आमदार कोथरुडस्थित असावा की बाहेरचा.

भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा
भाजपवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की जनतेला फक्त गृहित धरले जात आहे. भाजपला असे वाटते की आम्ही कोणालाही कुठूनही उभे करु, कोणाला काय विचारायचं. मतदारसंघात जात पाहून भाजपकडून राजकारण केले जाते. मतदारसंघात जात हा निकष कशाला लागतोय, मतदारसंघात जात हा निकष नको. भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे म्हणून सरकार हवे तसे निर्णय घेत आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्याचे सांगताना राज ठाकरे म्हणाले की, मनमोहन सिंह यांच्यासारख्या एका मोठ्या, तज्ज्ञ व्यक्तीने सांगितले की या मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार आहे, राज्यातील उद्योगधंदे बंद होतील. हे ऐकून धस्स व्हायला होतं.

पुण्यात तोडण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पुतळा तोडणारांना राम गणेश गडकरी कोण होते हे तरी माहिती आहे काय ? त्यांना वाटलं असावं कि ते नितीन गडकरी यांचे नातेवाईक आहेत म्हणून पुतळा तोडला असावा.

जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्याबद्दल अभिनंदन, परंतू महाराष्ट्रातील तरुणांबद्दल, तरुणींच्या नोकरीबद्दल कोण बोलणार, महाराष्ट्रातील प्रश्नाबद्दल कोण बोलणार. परंतू सरकार यावर बोलायला तयार नाही, सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, असा निशाणा राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर साधला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी