मुख्यमंत्र्यांना सांगा आमच्या बापात दम आहे, दत्तक बापाची गरज नाही : शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला असून अनेक राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या प्रचारात अनेक नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.

नाशिकमध्ये प्रचारासाठी आले असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटले कि, मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले, मात्र या ठिकाणी कसलीही प्रगती नाही. मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची आम्हाला गरज नाही असे त्यांना सांगण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. आमच्या बापात दम आहे असे त्यांना सांगा, असे म्हणत पवार यांनी फडणवीस यांच्यावर तोफ डागली. तसेच 24 तारखेला तुम्हाला नागपूरला जायचे असल्याने पसारा आवरायला घ्या, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

या प्रचारसभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. अमित शहा यांना पाच वर्षांपूर्वी कुणी ओळखत होते का ? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. त्याचबरोबर मी राज्यात आणि केंद्रात इतकी पदे भूषवली असताना शहा नावाची व्यक्ती महाराष्ट्रात येऊन मी काय केले हे विचारते, जर मी काहीच केले नसते तर मला इतका सन्मान मिळाला असता का ? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. दरम्यान, यावेळी त्यांनी पुलवामा हवाई हल्ल्याचे श्रेय घेणाऱ्या मोदी नि शहा यांच्यावर कडाडून टीका केली. तसेच सैन्याच्या नावाखाली मते मागणाऱ्या सरकारचा निषेध केला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी