…अखेर उद्धव ठाकरे चर्चेला तयार, मात्र अटी-शर्ती लागू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्रीपदावर तडजोड होऊच शकत नाही, हे पद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचा निर्णय झालाच नव्हता या फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेने चर्चेला खीळ बसली. त्यामुळे निकालानंतर 14 दिवस उलटले तरी अद्याप राज्यात सत्ता स्थापनेचा महुर्त मिळालेला नाही. आधी बसू मग बोलू अशी भूमिका घेत भाजपने शिवसेना नेतृत्त्वाला चर्चेचे आमंत्रण दिले असतानाच आता उद्धव ठाकरे यांनीही चर्चेला मंजुरी दिली असल्याचे समजतेय.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर नवनिर्वाचीत आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना प्रमुख काहीसे भावनिक झाल्याचा सूर लावत शिवसैनिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी मला स्वत:हून युती तोडायची नाही असे ठामपणे सांगत त्यांनी भाजपच्या कोर्टात चेंडू ढकलला. जे ठरलं ते मान्य असेल तर फोन करा, मी चर्चेला तयार आहे असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

भाजपकडून इतर नेते बोलत आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख म्हणजेच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनीच चर्चेसाठीचा फोन करावा असे सांगत इतरांच्या बोलण्याला आपण महत्त्व देत नसल्याचे एकप्रकारे बोलून दाखवले आहे. भाजपने ताठरपणाची भूमिका सोडून द्यावी. जे ठरलं तस होणार असेल तर भाजप श्रेष्ठींनी फोन करावा असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मला ठरल्यापेक्षा एक कणही जास्त नको, पण मला खोटं ठऱवायचं असेल तर ते योग्य नसल्याचे देखील त्यांनी भाजपला सुनावले.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके