शरद पवारांना राज्यात आश्चर्यकारक निकाल लागण्याचा ‘विश्वास’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची सांगता आज होत असून 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला निकाल घोषीत होणार आहे. यंदाच्या निवडणुकांचे निकाल आश्चर्यकारक असतील. लोकांचा प्रतिसाद पाहता हे घडू शकतं असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. एका मराठी माध्यमाशी बोलताना शरद पवार यांनी हे भाष्य केले.

सत्तेच्या काळात असणारे नेते सोडून गेले
मागील अनेक वर्षापासून माझ्या पक्षात बऱ्याच घडामोडी घडल्या. सत्तेच्या काळात असणारे नेते सत्ता नसताना सोडून गेले, सत्तेशिवाय न राहण्याची स्थिती आल्यामुळे नेत्यांच्या मनात चलबिचल झालीत. असे नेते सत्ताधारी पक्षात गेले. पक्षांतर केलेल्या काही नेते सोडले तर इतरांना संधी मिळाली नाही. या नेत्यांचा वापर करून घेतला. एखाद्याला किंमत दिली जाते. नंतर त्याला बाजूला सारले जाते असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

वाजपेयींच्या काळात विचारधारेचा पक्ष होता
अटलबिहारी वाजपेयींच्या काळात मेगाभरती असे काही नव्हते. तेव्हा विचारधारेने पक्ष चालत होता. आज स्थिती तशी राहिलेली नाही. जो येतोय त्याला घ्या अशी स्थिती आहे. जे येणार नाहीत त्यांना सत्तेचा गैरवापर करून पक्षात घेतलं जातं असा आरोप शरद पवार यांनी भाजपवर केला आहे. तसचे कलम 370 ला विरोध केला नाही तर स्थानिक जनतेला, नेत्यांना विश्वासात घेवून निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली. मात्र, ती मागणी केल्याने पंतप्रधान डुब मरो असे बोलतात, हे योग्य नाही.

सावरकरांना भारतरत्न देण्यात गैर नाही
वीर सावरकरांच्या हिदुत्ववादी विचाराला विरोध आहे मात्र त्यांनी विज्ञानवादी विचारांना चालना दिली. त्याबद्दल त्यांना भारतरत्न देणे गैर वाटत नाही. सावरकरांचे नेतृत्व भाजपने कधीच मानले नाही. जनसंघ असो वा भाजप स्थापनेपासूनचा इतिहास आठवतो, तर सावरकरांच्या हिंदू महासभेला जनसंघाचा पाठिंबा नव्हता. असे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या