…तर पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती : उद्धव ठाकरे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सातारा येथे मुसळधार पावसामध्ये भिजत सभा घेतली. यावर टीका करताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर तुम्ही 70 हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर तुम्हाला पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती. तसेच एका विचारांच स्थिर सरकार आपण महाराष्ट्राला दिलं आहे. राष्ट्रवादीवाले भर पावसामध्ये सभा घेत आहेत पण गावांमध्ये ठणठणाट असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

माण येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हा करायचं होत तेव्हा केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूत पणाने पुढे पाऊल टाकत आहे तेव्हा त्याला अपशकुन करायचा. समाजा समाजामध्ये भिंती उभ्या करायच्या. असे का करायचे ? शिवरायांनी भिंती तोडून टाकल्या होत्या आणि समाजाला भगव्या झेंड्याखाली एकवटले होते. बारा मावळ एकवटल्यानंतर जी ताकद उभी राहिली ती महाराष्ट्रात नाही देश नाही तर पूर्ण जगाचे डोळे दिपवणारी होती असं त्यांनी सांगितले.

हा देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज की जय बोललो की अंगावर रोमांच उभे राहतात. मराठा समाजाचा मागे जशी शिवसेना उभी राहिली तशी धनगर समाजाच्या मागे माळी समाजाच्या मागेसुद्ध शिवसेना उभी आहे. शिवसेनाप्रमुखांनी एक शिकवण दिली आहे. प्रत्येक जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. शिवरांयीच शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला वारंवार दिली असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.