पोस्टल मतदान गोपनीयतेचा भंग, युनियन बँकेच्या अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीगोंदा (जि. नगर): पोलीसनामा ऑनलाइन – पोस्टल मतदान करताना चे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी युनियन बँकेच्या पंढरपूर शाखेतील अधिकारी संतोष छबुराव खंडागळे (रा.लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज निवडणूक निर्णय अधिकारी 226 श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ व निवडणूक निरीक्षण अधिकारी हे तहसिल कार्यालय, श्रीगोंदा येथे सायंकाळी 7 वाजता सुमारास असताना भा.ज.पा प्रतिनिधी तुकाराम दरेकर हे कार्यालयात आले. त्यांनी
श्रीगोंदा येथील पोस्टल मतपत्रिका नंबर 1293 वर कोणीतरी इसमाने मतदान करुन मतदान प्रकियेचा गोपनियतेचा भंग केला आहे, असे सांगितले.

ही मतपत्रिका कोणाला दिली आहे, याबाबत शोध घेतला असता सदरची मतपत्रिका संतोष छबुराव खंडागळे यास दिल्याचे आढळून आले. तो सध्या पंढरपूर येथील युनियन बक ऑफ इंडीया, शाखा लक्ष्मी रोड येथे कार्यरत आहे. ते सध्या मतदान केंद्राघ्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हयात निवडणूक कामी असल्याचे समजले आहे. त्या इसमाने मतपत्रिकेवर मतदान करुन बंद लिफाफ्यात पाठविण्यापूर्वी अनाअधिकाराने मतदान केल्याचे व्हिडीओ क्लिप काढून ती उघड करण्यासाटी सोशल मिडीयावर सार्वजनिक करुन व्हायरल केली आहे. गोपनियतेचा भंग केला तसेच प्रशांत घनशाम शेलार याचा फोन नंबर 9545451212 वर पाठविली असता त्याने ती त्याचे व्हाटस अपवर स्टेटस वरुन ठेऊन सार्वजनिक केली. त्यामुळे त्याचे मतपत्रिकेबाबत गोपनियतेचा भंग झाला.

याप्रकरणी निवडणूक भरारी पथकातील विकास पवार यांचा फिर्यादावरून संतोष खंडागळे याच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 128.136( एफ) (2)प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.