कणकवलीत नितेश राणेंची बाजी, शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा 28116 मतांनी पराभव

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या कणकवली मतदरासंघात भाजपच्या नितेश राणे यांचा 28116 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेने सतीश सावंत पराभव केला आहे.

शिवसेना-भाजपाच्या महायुतीत वादग्रस्त ठरलेल्या जागेपैकी एक म्हणजे कणकवली मतदरासंघ आहे. राज्यभरात युतीत लढणारी भाजपा-शिवसेना या मतदारसंघात आमनेसामने आल्यामुळे राज्याचे लक्ष या मतदारसंघाच्या निकालाकडे लागून राहिले होत. कणकवली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने आणि नारायण राणे यांनी प्रतिष्ठेचा केला होता. त्यात नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. कणकवली मतदारसंघात 60 टक्क्यांच्या वर मतदान झालं होत.

नारायण राणे आणि शिवसेना वाद
नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यापासून शिवसेना आणि राणे यांच्यात वाद सुरु आहेत. शिवसेना सोडल्यापासून राणे नेहमीच शिवसेनेवर टीका करताना दिसतात तर लोकसभा 2014ची निवडणूक असो, विधानसभा असो, वांद्रे पोटनिवडणूक असो की, 2019ची लोकसभा निवडणूक, शिवसेनेने नारायण राणे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. निवडणुकीच्या प्रचारदरम्यानही शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पाहायला मिळाला होता. नितेश राणेंना पराभूत करण्याच्या उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत प्रचार सभा घेत नारायण राणेंवर टीका केली होती.

नारायण राणे कणकवली-मालवण या मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आले. 2014 साली नारायण राणे यांचा बालेकिल्ला ढासळला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 10 हजार मताधिक्‍याच्या फरकाने नारायण राणे यांचा पराभव केला होता . 2014 साली पुन्हा नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि राणे पुन्हा आपला बालेकिल्ला काबीज केला. कणकवली मतदारसंघाचे नितेश नारायण राणे हे विद्यमान आमदार आहेत. 2014च्या विधानसभा निवडणूकीत नितेश नारायण राणे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर भाजपच्या प्रमोद जठार यांचा दारूण पराभव केला होता .

कणकवली मतदरासंघ –

1 नितेश नारायण राणे (भाजप) 84504 (विजयी उमेदवार )
2 सतीश जगन्‍नाथ सावंत शिवसेना 56388
3 विजय सुर्यकांत साळकर (बहुजन समाज पार्टी) 416
4 राजन शंकर दाभोलकर (मनसे) 1421
5 सुशील अमृतराव राणे (काँग्रेस) 3355
6 मनाली संदीप वंजारे (वंचित बहुजन अघाडी) 2054
7 प्रा. वसंतराव भाऊसाहेब भाेेसले (बहुजन मुक्ति पार्टी) 378
8 NOTA 1945

Visit : Policenama.com