भोसरीमध्ये भाजपच्या महेश लांडगे यांचा ७७ हजार ५६७ मतांनी दणदणीत विजय

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार पैलवान आमदार महेश लांडगे ७७ हजार ५६७ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला आहे.

भोसरी मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्यात दुरंगी लढत झाली. त्यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात होते. या मतदार संघात ५९ टक्के मतदान झाले होते. एकूण २ लाख ६३ हजार ३६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

याठिकाणी २० टेबलांवर मतमोजणी झाली. मतमोजणीच्या २१ फेर्‍या पार पडल्या. पहिल्या फेरीपासूनच लांडगेंची आघाडी घेतली असून त्यांच्या मतांच्या जवळपास पोहचताना लांडे यांची चांगलीच दमछाक झाली. प्रत्येक फेरीअखेर लांडे हे लांडगेंच्या तुलनेत निम्म्या मताने मागे असल्याचे पहायला मिळाले. लांडगेंची सततची आघाडी पाहून सातव्या फेरीअखेरच त्यांच्या समर्थकांनी भंडार्‍याची उधळण सुरु केली आहे. विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी बालेवाडीतील मतमोजणी केंद्रातून हळूहळू काढता पाय घेतला.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने आपला उमेदवार न देता अपक्ष विलास लांडे  यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच पक्षांनी लांडे यांच्या विजयासाठी जोर लावला होता. मात्र अखेर या अटीतटीच्या लढतीत लांडगे यांनी विजय मिळवला.  याआधी 2009 मध्ये अपक्ष म्हणून विजय मिळवलेल्या विलास लांडे यांच्यासाठी कदाचित हि शेवटची विधानसभा निवडणूक ठरू शकते. त्यामुळे आता पुढील विधानसभा निवडणुकीत ते उभे राहण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र या विजयामुळं लांडगे हेदेखील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार ठरणार आहेत.

1. पवार राजेंद्र आत्माराम (बहुजन समाज पार्टी) – 1859
2. महेश (दादा) किसन लांडगे (भाजप) – 159020
3. गजरमल विश्वास भगवान (जनहित लोकशाही पार्टी) – 706
4. वहिदा एस. शेख (समाजवादी पार्टी) –611
5. विजय लक्ष्मण अराखे (बहुजन मुक्ती पार्टी) – 424
6. शहानवाज शेख (वंचित) – 13151
7. छाया संजय जगदाळे-सोळंके (अपक्ष) – 501
8. डोळस हारेश बाजीराव (अपक्ष) – 243
9. बाहुसाहेब रामचंद्र अडागळे (अपक्ष) – 300
10. मारूती गुंडप्पा पवार (अपक्ष) – 384
11. लांडे विलास विठोबा (अपक्ष) – 81543
12. ज्ञानेश्वर (माऊली) सुरेश बोराटे (अपक्ष)  604  –
13. नोटा – 3630

Visit : Policenama.com