विधानसभेआधी राष्ट्रवादीत होणार मोठी ‘उलथापालथ’ ; शरद पवारांनी दिले संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत मोठ्या पऱाभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणूकांची तयारी जोमात सुरु केली आहे. विधानसभेआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पक्षातील साचलेपणा दूर करण्यासाठी शरद पवार मोठी पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत. तर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये तरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे अशी भूमीका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात काय मोठे बदल राष्ट्रवादीत होणार हे पाहावं लागेल.

राहूल गांधी यांच्या भेटीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सुरु होती. त्या चर्चेला शरद पवार यांनी पुर्णविराम दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या अफवा असून आमची अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. ही फक्त मिडीयामध्येच चर्चा आहे. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनीही या चर्चांना विराम दिला.

You might also like