शेंबडा मुलगाही महायुतीचं सरकार येणार सांगतोय : CM देवेंद्र फडणवीस

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ आज कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त करताना पाच वर्षाचा शेंबडा मुलगाही महायुतीचं सरकार येणार असे सांगतो असे यावेळी त्यांनी म्हटले. यावेळी नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करत असल्याची घोषणा केली.

नितेश राणे यांनी यावेळी अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश मुंबईत व्हावा अशी अनेकांची इच्छा होती. मात्र, सिंधुदुर्गच्या लोकांची इच्छा होती की हा प्रवेश कणकवलीमध्ये व्हावा, म्हणून नितेश राणे यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम कणकवलीत घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी नारायण राणे यांचे कौतुक करत नारायण राणे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं स्थान असून सर्व विषयाची जाण असणारे नेते असल्याचे त्यांनी म्हटलं.

महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये कोठेही चुरस दिसत नसल्याचे सांगत ही निवडणूक प्रेमाने आणि जनतेसोबत लढली पाहिजे असे सांगताना अनेक लोक चिथवण्याचा प्रतत्न करतील. जे जिंकणारे असतात त्यांनी वाघासारखं, मोठ्या मनानं वागायचं असतं असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. नितेश राणे हे नारायण राणे यांच्या नेतृत्वात घडले आहे. आता ते आमच्या शाळेत आले आहेत. ते आक्रमक आहेत पण ते आमच्या शाळेत आले असून त्यांना संयम शिकवणार असल्याचे सांगितले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी