उदयनराजेंना विकास कळत नाही, शिवछत्रपतींच्या जमिनी विकून कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठीच उदयनराजे भाजपात : मलिक…(व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी आज दिल्ली येथे अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मागील अनेक दिवसांपासून अनेक बडे नेते भाजपात जात असल्याने आधीच हतबल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उदयनराजेंचा हा प्रवेश चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. अशातच शिवछत्रपतींच्या जमिनी विकून कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठीच उदयनराजे भोसले भाजपात गेले आहेत असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

काय म्हणाले नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत उदयनराजेंवर कडाडून टीका केली. ते म्हणाले,“उदयनराजे १९९९ साली भाजपाचे आमदार आणि मंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना हरवलं होतं. त्यानंतर त्यांच्या आईच्या आग्रहाखातर शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीत घेऊन पक्षाचे तिकीट दिले ज्यावर ते खासदार झाले. सलग ३ वेळा आईच्या आग्रहाखातर दरवेळी त्यांना तिकीट देत असत आणि ते राष्ट्रवादीकडून निवडून येत तरीही राष्ट्रवादीमध्ये असूनही ते कायमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातली भूमिका घेत असत.” असे सांगत साताऱ्यात पुन्हा एकदा उदयनराजेंचा पराभव करु इतकंच नाही तर सातारा विधानसभेच्याही जागा जिंकू असा दावाही त्यांनी केला.

उदयनराजेंना विकास कळत नाही
राष्ट्रवादीत असताना साताऱ्याचा विकास करता आला नाही मात्र भाजपाने केला असे उदयनराजे बोलले होते. त्यावर पलटवार करत मलिक यांनी, “उदयनराजेंना विकास कळत नाही, त्यांच्यात विचार करण्याची ताकद आहे का? उदयनराजे दिवसा काय करतात ते साताऱ्यातल्या लोकांना माहित आहे” अशी टीका केली.

देशभरातील राजे-रजवाड्यांना संस्थानिक जमिनी विकण्याची संमती देण्याचं आमिष दाखवूनच भाजपा त्यांना आपल्याकडे वळवत आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला. शिवरायांच्या जमिनी विकण्याचा प्रयत्न झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या