शिवसेनेच्या राजीनाम्याच्या धमक्या सर्वसामान्यांसाठी नाही तर पैशासाठी, राज ठाकरेंचे शिवसेनेवर ‘शरसंधान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि मनसे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका किंवा आरोप केल्याशिवाय रहात नाहीत. मागाठाणेत झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या राजीनाम्याच्या इशाऱ्यावरून खरपूस समाचार घेतला. पैशांची कामे अडकल्यावर शिवसेनेकडून राजीनाम्याच्या धमक्या दिल्या जायच्या. शिवसेनेच्या धमक्या सर्वसामान्यांसाठी नाही तर पैशांसाठी होत्या. हेच करून त्यांनी पाच वर्ष मुर्ख बनवल्याचे सांगत शिवसेनेला लक्ष केलं.

राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपवर मागाठाणेत तोफ डागली. भाजप, शिवसेनेने लावलेल्या पोस्टरवर ‘हीच ती वेळ’ असा मजकूर लिहलेला आहे. माग पाच वर्षे वेळ नव्हती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले, आरेमधील झाडं कापू देणार नाही अशी शिवसेनेची भूमिका होती. एका रात्रीत झाडं कापली. यानंतर आमचं सरकार आल्यानंतर आरेला जंगल म्हणून घोषीत करू असे पक्षप्रमुख म्हणतात. आता आरेला जंगल म्हणून घोषीत करून करणार काय ? तिथे गवत लावणार का ? असा प्रश्न त्यांनी शिवसेनेला विचारला.

रस्त्यांच्या खड्ड्यावरून सरकारला धारेवर धरताना राज ठाकरे म्हणले, 2014 मध्ये शिवसेनेनं रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाचं काय झाल, असा सवाल त्यांनी विचारला. सध्या सिटी बँक अडचणीत आहे. ती बँक शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची आहे. या प्रश्नात शिवसेनेने काय केले. आरे असो वा अडचणीत सापडेलेली बँक याबाबत शिवसेना जाहीरनाम्यात एक शब्दसुद्धा नाही असे सांगत शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर शरसंधान साधलं.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

You might also like