Assembly ElectionsResultsविधानसभा 2019

काँग्रेसच्या नाना पटोले यांची विजयी झुंज, भाजपच्या परिणय फुकेंचा मोठा पराभव

साकोली, पोलीसनामा ऑनलाइन – साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे नाना पटोले यांनी अखेर विजयांचा गुलाल उधळला आणि भाजपचे पानिपत केले नाना पटोले आणि भाजपचे परिणय फुके यांच्यात टफ फाइट दिसून आली. नाना पाटोळे आणि परिणय फुके यांच्यात मतदान मोजणीपासूनचे चुरस पाहायला मिळाली होती. त्यानंतर नाना पटोले आघाडी घेताना दिसत होते. अखेर पटोले यांनी बाजी मारली. पटोले यांनी 6240 मतांनी विजयी झाला.

नाना पटोले यांना 94,182 मते मिळाली तर भाजपचे परिणय फुके यांना 87,005 मते मिळाली, पण काँग्रेसच्या नाना पटोले यांनी आघाडी घेतल्याने भाजपचा पानिपत झाला. परिणय फुके यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी देखील सभा घेतली होती. परिणय फुकेंना निवडूण आणण्यासाठी भाजपने मोठी ताकदपणाला लावली होती तर नाना पटोले यांनी देखील जोरदार शक्ती प्रर्दशन केले होते.

दुपारी 4.10 मिनिटांनी दोघातील फरक फक्त 1500 ते 2000 मतांचा होता. नाना पटोले यांना 66,708 मते मिळवू आघाडीवर होते तर परिणय फुके 64,066 मते घेऊन पिछाडीवर होते. यामुळे दोघात चांगलीत चुरस रंगली होती. त्यात वंचिततचे उमेदवार सेवकभाऊ वाघये यांना 28,354 मते मिळाल्याने ते देखील पिछाडीवर होते.

मागील विधानसभा निवडणुकीत साकोली विधानसभा मतदारसंघातून भाजप च्या राजेश काशीवार यांनी 80 हजार 902 एवढी मते घेत विजय मिळवला. साकोली विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस चे सेवक वाघाये होते. त्यांना 55 हजार 413 मते मिळाली. आणि त्यांचा 25 हजार 489 मतांनी पराभव झाला. साकोली विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर बसपा चे महेंद्र गणवीर, चौथ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील फुंदे आणि पाचव्या क्रमांकावर अपक्षचे अजय तुमसरे होते.

1. नानाभाऊ फाल्गुणराव पटोले (काँग्रेस) – 94182 मते
2. डॉ. परिणय रमेश फुके (भारतीय जनता पार्टी) – 87005 मते
3. डॉ. प्रकाश मालगावे (बहुजन समाज पार्टी) – 3587 मते
4. आगाशे उर्मिला प्रशांत (बलीराजा पार्टी) – 400 मते
5. गणेश अशोक खंडाते (गोंडवाना गणतंत्र पार्टी) – 335 मते
6. पंकज नंदकुमार खेडीकर (जय महा भारत पार्टी) – 304 मते
7. सेवकभाऊ निर्धन वाघाये (वंचित बहुजन आघाडी) – 33680 मते
8. संदीप सूर्यभान रामटेके पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) – 371 मते
9. अतुल नारायण परशुरामकर (अध्यक्ष) – 643 मते
10. चोपराम शिवाजी तिवाडे (अध्यक्ष) – 544 मते
11. महेशकुमार भोजराम भदाडे (अध्यक्ष) – 197 मते
12. राजू रामभाऊ निर्वाण (अध्यक्ष) – 198 मते
13. विजय महादेव खोब्रागडे (अध्यक्ष) – 624 मते
14. सुभाष रामचंद्र बावनकुळे (अध्यक्ष) – 702 मते
15. सुहास अनिल फुंडे (अध्यक्ष) – 517 मते
16. NOTA – 1517 मते

Visit : Policenama.com 

Back to top button