Maharashtra Vidhansabha Speaker Election | शहाजीबापू मतदानासाठी उभे राहताच सभागृहात एकच कल्ला, सरनाईक-जाधवांच्या वेळी ‘ED-ईडी’ची शेरेबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Vidhansabha Speaker Election | विधानसभेच्या विशेष एकदिवसीय अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशीच विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी भाजपाचे राहुल नार्वेकर 164 मते मिळवून जिंकले. शिवसेनेतील बंडखोर आमदार तसेच बहुजन विकास आघाडी, मनसे, प्रहार आणि अपक्ष आमदारांनी शिंदे आणि भाजपाकडून मतदान केले. (Maharashtra Vidhansabha Speaker Election)

 

या निवडणुकीत शिवसेनेचा व्हीप झुगारून बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपाच्या बाजूने राहुल नार्वेकर यांना मतदान केले. आवाजी मतदानाने मतदान घेण्यात आले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जागेवर उभे राहून आमदारांनी नाव आणि अनुक्रमांक उच्चारून हे मतदान घेतले गेले.

 

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील
शिवेसेनेतून फुटलेला बंडखोर शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी उभे राहुन आपले नाव आणि नंबर पुकारत मतदान केले. यावेळी ‘झाडी, डोंगार, हाटील’ या वाक्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिंदे गटातील शहाजीबापू मतदानासाठी उभे राहताच सभागृहात एकच कल्ला झाला. शहाजीबापू पाटील यांचा 112 वा क्रमांक होता. ते जागेवर उभे राहताच सभागृहातील आमदारांनी एका सूरात ’काय झाडी,काय डोंगार, काय हाटील’ असा डायलॉग म्हटला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

 

तर प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव यांचा नंबर पुकारताच विरोधी बाकावरुन ईडी सुटकेचा घोषणा देण्यात आल्या.
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानावेळी शिवसेनेच्या बंडखोर आमदार यामिनी जाधव यांनी भाजपाकडून मतदान करताच ईडी-ईडीच्या घोषणांनी सभागृहात दणाणून गेले.
शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यामिनी यांच्यासमोर ‘ईडी-ईडी’च्या घोषणा
भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे बृहन्मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत.
ईडी त्यांच्याविरुद्ध फेमाच्या कथित उल्लंघनाशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहे.
त्याच वेळी, ईडीच्या तपासापूर्वी प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांनी करचुकवेगिरीच्या आरोपाखाली वांद्रे येथील
एक फ्लॅट आणि यशवंत जाधव आणि कुटुंबाच्या सुमारे 40 मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत.

 

Web Title :- Maharashtra Vidhansabha Speaker Election | Maharashtra Vidhansabha Speaker Election discussion of shahajibapu patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar On Girish Mahajan | ‘देवेंद्र फडणवीस CM न झाल्याने गिरीश महाजन तर अजूनही फेट्याने डोळे पुसत आहेत’ – अजित पवार

 

Ajit Pawar And Vidhansabha Speaker Election | विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन… अजितदादांच्या भाषणाची जोरदार चर्चा

 

Eknath Shinde Government | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात पुणे शहर आणि जिल्ह्याला किती मंत्रीपदे?