Maharashtra Vidhansabha Speaker Election | शिवसेना मोठ्या खेळीच्या तयारीत? बंडखोरांवर विधानभवनाच्या गॅलरीतून ‘वॉच’?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Vidhansabha Speaker Election | शिवसेना पक्षातील (Shivsena) आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले. सुरत, गुवाहाटी आणि नंतर गोव्यात वास्तव्यास असलेले बंडखोर आमदार 12 दिवसानंतर मुंबईत परतले असून आज विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला ते उपस्थित राहिले. तत्पूर्वी सर्व आमदारांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Maharashtra Vidhansabha Speaker Election)

 

हे बंडखोर आमदार सभागृहात आले पण ते सत्ताधारी बाकावर बसले. तर समोर शिवसेनेचे आमदार होते. याचवेळी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत शिवसेनेचे काही नेते बसले होते. बंडखोरांवर वॉच ठेवण्यासाठी हे आमदार प्रेक्षक गॅलरीत बसले असल्याची चर्चा यावेळी सुरू होती.

 

शिवसेनेकडून सातत्याने सांगितले जात होते की, 12 ते 15 बंडखोर आमच्या संपर्कात आहेत. त्यांना गुवाहाटीत डांबून ठेवले आहे. मात्र आज विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या या सर्व बंडखोर आमदारांनी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केल्याचे उघड झाले. (Maharashtra Vidhansabha Speaker Election)

विधानसभेच्या विशेष अधिकवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी प्रेक्षक गॅलरीत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर,
अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत, विनायक राऊत आणि सचिन अहिर बसले होते.
बंडखोरांच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे बारीक लक्ष होते.

 

मात्र, अपेक्षित असे काही न घडल्याने आता शिवसेना वेगळी खेळी खेळणार का? की आक्रमक होत
संघटना मजबूत करण्यासाठी पावले उचलणार हे आगामी काळात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Vidhansabha Speaker Election | shivsena leader sitting in assembly gallery during maharashtra assembly speaker election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sudhir Mungantiwar To Ajit Pawar | सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ‘…तर तुम्हीही आमच्या कानात’

 

Samantha Ruth Prabhu | समंथाने सांगितले लग्न तुटण्याचे कारण, म्हणाली….

 

Ajit Pawar On Girish Mahajan | ‘देवेंद्र फडणवीस CM न झाल्याने गिरीश महाजन तर अजूनही फेट्याने डोळे पुसत आहेत’ – अजित पवार