Maharashtra Vidhimandal Adhiveshan | विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन 17 जुलै रोजी मुंबईत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Vidhimandal Adhiveshan | विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2023) आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी विधानभवन, मुंबई (Vidhan Bhavan Mumbai) येथे होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी विधान परिषदेत तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Adv Rahul Narwekar) यांनी विधानसभेत केली. (Maharashtra Vidhimandal Adhiveshan)
विधानपरिषद कामकाज (Maharashtra Legislative Council Work)
विधानपरिषदेत प्रत्यक्षात 125 तास 20 मिनिटे कामकाज झाले. सरासरी कामकाज 6 तास 57 मि. झाले. सन्माननीय सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 91.22 टक्के होती तर सदस्यांनी एकूण सरासरी उपस्थिती 80.60 टक्के होती. (Maharashtra Vidhimandal Adhiveshan)
विधानसभा कामकाज (Maharashtra Assembly Work)
विधानसभेत प्रत्यक्षात 165 तास 50 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 10 मिनिटे झाले. सन्माननीय सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 94.71 टक्के होती. तर एकूण सरासरी सदस्यांची उपस्थिती 80.89% होती.
Web Title :- Maharashtra Vidhimandal Adhiveshan | Budget Session of Legislature adjourned with National Anthem; Next session on July 17 in Mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपीचे बेडीसह पलायन, शिरुर पोलीस ठाण्यातील घटना