राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी ‘या’ 33 दिग्गजांची ‘चढाओढ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 15 दिवसांनी खातेवाटप करण्यात आले. सात मंत्र्यांकडे तब्बल 56 खात्यांचा पदभार देण्यात आला आहे. या खातेवाटपात शिवसेनेकडे 22 महत्वाची खाती आल्याचे दिसत आहे. हे खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार 23 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. विस्तारामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडून इच्छुक नेत्यांची गर्दी आहे.

राष्ट्रवादीकडून इच्छूक
अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, राजेंद्र टोपे, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, बबन शिंदे, सरोज अहिरे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संग्राम जगताप.

काँग्रेसमधील इच्छूक
अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, विश्वजित कदम, विजय वडेट्टीवार, के.सी. पाडवी, सतेज पाटील, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, सुनील केदार, अमीन पटेल, नसीम खान, प्रणिती शिंदे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/