अखेर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं खातेवाटप ‘फायनल’ ! मुश्रीफ यांच्याकडे ‘ग्रामविकास’ तर पाटील यांच्याकडे ‘सहकार’ ? , जाणून घ्या यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा खातेवाटपावरून असलेला तिढा अखेर सुटला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. खातेवाटप जवळपास फायनल झाल्याचं देखील सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप खातेवाटप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने खातेवाटपाची यादी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खालील प्रमाणे खाते वाटप असू शकतं.

जवळपास फायनल झालेलं खातेवाटप (अद्याप अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही)

राष्ट्रवादी काँग्रेस –
1. उपमुख्यमंत्री अजित पवार – वित्त व नियोजन (अर्थमंत्री
2. अनिल देशमुख – गृह विभाग
3. जयंत पाटील – जलसंपदा
4. छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा
5. दिलीप वळसे- पाटील – उत्पादन शुल्क व कोशल्य विकास
6. धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
7. बाळासाहेब पाटील – सहकार व पणन
8. हसन मुश्रीफ – ग्रामविकास
9. डॉ. राजेंद्र शिंगणे – अन्न व औषध प्रशासन
10. राजेश टोपे – आरोग्य
11. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
12. नवाब मलिक – अल्पसंख्याक विकास आणि कामगार मंत्री

काँग्रेस –
1. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकम विभाग(पीडब्ल्यूडी)
2. बाळासाहेब थोरात – महसूल
3. डॉ. नितीन राऊत – उर्जा
4. विजय वड्डेटीवार – ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन
5. यशोमती ठाकूर – महिला बालविकास
6. के.सी. पाडवी – आदिवासी विकास
7. अमित विलासराव देशमुख – वैद्यकीय शिक्षण तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री
8. वर्षा गायकवाड – शालेश शिक्षण
9. अस्लम शेख – वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे
10. सुनिल केदार – क्रीडा व युवक कल्याण, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन

राज्यमंत्री
1. डॉ. विश्वजीत कदम – सहकार, कृषी
2. सतेज उर्फ बंटी पाटील – गृह, गृहनिर्माण

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/