महाराष्ट्र विश्व न्यूज चे मुख्य संपादक विशाल मुंदडा यांना मातृशोक

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र विश्व न्यूजचे मुख्य संपादक विशाल मुंदडा यांच्या मातोश्री स्व. उज्वला विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन झाले. त्या 49 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सदैव हसतमुख, इतरांच्या मदतीला तत्पर असलेल्या, सर्वांच्या सुख, दुखा:त सहभागी होणे असा त्यांचा सामाजिक लौकीक होता.बुधवारी दुपारी 4.30 च्या दरम्यान घरी परतत असतांना, स्पीड ब्रेकरवर झटका बसल्यामुळे दुचाकीवरून त्यांचा तोल गेला. त्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या असता त्यांच्या मेंदूला जोरात मार लागला.

त्यांना उपचारासाठी तात्काळ परभणी येथील आयसीयु या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र परिस्थिती नाजूक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलवण्यात आले.परंतू, उपचाराला प्रतिसाद देण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. आज गंगाखेड या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

मुंदडा परिवाराचा अवयवदानाचा निर्णय

मातोश्री स्व. उज्वला विजयकुमार मुंदडा यांच्या अपघाती निर्णयानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक दायित्व जपत मुंदडा परिवाराने घेतलेला हा निर्णय अनेकांना जीवदान देणारा आहे.