home page top 1

सोलापूर, लातूरमध्ये जोरदार पाऊस ; मतदारांची मतदार केंद्राकडे पाठ

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर शहरात रात्रभरापासून जोरदार पाऊस पडत असून सकाळीही पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे सोलापूरातील विनायक नगर परिसरातील मतदान केंद्रात पावसाचे पाणी शिरले आहे. तेथे मतदान केंद्रांच्या खोल्यांमध्ये पाणी शिरले असल्याने मतदानाला कोणीही जाऊ शकत नाही. मतदानासाठी सकाळपासून कोणीही फिरकले नाही. पावसामुळे अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.

लातूरमध्ये रात्रभर सुरु असलेला पाऊस अजूनही थांबला नसल्याने मतदानासाठी नागरिक बाहेर पडलेले नाही. अनेक ठिकाणी सकाळच्या एक तासात एकही मतदार मतदान केंद्रात आला नव्हता. अजूनही अधून मधून पावसाच्या सरी येत असून आकाश ढगाळ आहे. दिवसभर पाऊस राहण्याची शक्यता दिसून येत आहे.

राज्यातील अनेक शहरांमध्ये सध्या पावसाळी वातावरण असून काही ठिकाणी पाऊसही होत आहे. त्याचा परिणाम सकाळच्या सत्र मतदानावर झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.

visit : Policenama.com

Loading...
You might also like