‘जनता’ पुराच्या पाण्यात ‘कोमात’, ‘मंत्री’ गिरीश महाजनांची सेल्फी ‘जोमात’ (व्हिडीओ)

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मागील १५ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या सर्व पूरग्रस्त नागरिकांना प्रशासनाने बाहेर काढले असून अजूनही मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मात्र पाहणी दौऱ्याच्या नावाखाली पर्यटनात मग्न असल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये गिरीश महाजन हे बोटीत बसून आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. या दौऱ्याचा आज व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार्यकर्ता व्हिडीओ शूट करत असून यामध्ये गिरीश महाजन हे हसत त्याला दाद देत असल्याचे दिसून येत आहे.

मुळे या दौऱ्याचे मंत्रीमहोदयांना किती गांभीर्य आहे असा संतापजनक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे एकीकडे हजारो नागरिकांचा संसार उघड्यावर पडला असताना आणि नागरिक मोठ्या संकटाला तोंड देत असताना गिरीश महाजन मात्र आनंदी असल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात येत असून राजकीय नेत्यांनी देखील त्यांच्या या कृतीचा निषेध करण्यात आला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील गिरीश महाजन यांच्या या कृतीचा निषेध केला आहे.

धनंजय मुंढे यांनी ट्विटरवर गिरीश नका यांच्यावर निशाणा साधताना म्हटले कि, सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. एकीकडे लाखो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असताना मंत्री महोदय मात्र सेल्फी घेण्यात आणि पाहणी दौऱ्याला पर्यटन दौरा असल्यासारखे पाहण्यात मश्गुल आहेत. याची यांना लाज कशी वाटत नाही ? असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले कि, जनता पाण्यात असताना मंत्र्यांचे हे कृत्य चीड आणणारे आहे. त्यामुळे यांना शहाणपणा शिकवून काही उपयोग नाही. मदत करण्याचे सोडून सत्ताधारी स्वतःची जाहिरात करण्यात गुंग आहेत. या लोकांना नागरिकांच्या दुःखाशी काहीही सोयरसुतक नसून हे सेल्फी घेण्यात व्यस्त आहेत.

दरम्यान, एका बाजूला मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील मदत करण्याचे आदेश देत असताना मंत्री मात्र अशी कृत्ये करून आपल्याच सरकारचे वाभाडे काढण्याचे काम करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त