Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Forecast | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात उन्हाचा (Maharashtra Weather Forecast) चटका लागला आहे. एकीकडे राज्यातील काही ठिकाणी उन्हाने गाठलेला उच्चांकी तापमान तर दुसरीकडे काही भागात पावसाची (Rain) स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही, असं पुणे वेधशाळेकडून (Pune Observatory) सांगण्यात आले आहे.

 

उन्हाच्या चटक्यानंतर आता महाराष्ट्रात आगामी काही दिवस पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुसळधार पाऊसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मे महिन्याच्या तिस-या अथवा चौथ्या आठवड्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) आणि उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) काही भागांत 13 मे रोजी पावसाची शक्यता आहे. तसेच, रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon), नाशिक (Nashik), पुणे (Pune), नगर (Nagar) या जिल्ह्यात देखील 13 मे पर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने (Indian Meteorological Department (IMD) वर्तवला आहे. (Maharashtra Weather Forecast)

 

दरम्यान, कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यात आगामी दोन दिवस अवकाळी पावसाची (Untimely Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे आता शेतकरी चिंतेत आहे. कारण बागायतदारांना मोठे नुकसान होऊ शकतं. तसेच, अकोला, अमरावती या जिल्ह्यात आगामी चार दिवस तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचं हवामान खात्याने (Indian Meteorological Department (IMD) सांगितले आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Weather Forecast | imd rainfall in konkan and west maharashtra heat wave in amravti next 4 days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा