Maharashtra Weather | राज्यात आज काही ठिकाणी गारपीट तर ‘या’ जिल्ह्यात उन्हाचा तडाखा – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather | गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा लागला आहे. वाढत्या तापमानामुळे माणसाच्या जीवाची काहिली होत आहे. एकीकडे उन्हाचा चटका तर दुसरीकडे अवकाळी पावसाच्या (Untimely Rain) सरी कोसळताना दिसत आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, मागील चोवीस तासामध्ये कोकण (Konkan) आणि अंतर्गत परिसरात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस व तुरळक ठिकाणी गारा पडल्या आहेत. त्याचबरोबर आजही महाराष्ट्रात (Maharashtra Weather) काही ठिकाणी गारपीटीची शक्यता भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) वर्तवली आहे.

 

के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही ठिकाणी आगामी दोन दिवस गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर आज (शनिवारी) काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र, 3 ते 5 दिवस पावसाचा अंदाज दर्शविल्यानुसार काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. त्याचबरोबर कालच्या पावसाने पुणे (Pune) भागात किमान तापमानात अंशता घट झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Maharashtra Weather)

दरम्यान, उष्णतेचा हा वाढता पारा अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यातच राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊसही (Rain) पडत आहे. हवामानाच्या बदलामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आता आगामी दोन दिवस राज्यातील काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.

 

Web Title :- Maharashtra Weather | maharashtra weather forcaste imd predicts rain in some places of maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा