Maharashtra Weather | राज्यात अल्हाददायक थंडीची चाहूल ! विदर्भात पावसाचा अंदाज

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Maharashtra Weather | राज्यातील अनेक भागांमध्ये हवामानात (Maharashtra Weather) गारठा जाणवू लागला आहे. नागपूर शहर (Nagpur City) आणि विदर्भात हळूहळू अल्हाददायक थंडीला सुरुवात (cold in maharashtra) झाली आहे. मागील काही दिवसांपासून नागपूर शहराच्या तापमानात घसरण (temperature dropped) होत आहे. सोमवारी शहरात 13.4 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यातील जळगाव (Jalgaon) येथे सर्वात कमी 12.2 अंश तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नागपूर हे दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर ठरले.

 

नागपूर पाठोपाठ विदर्भातील यवतमाळ 14, अमरावती 14.1 अंश किमान तापमानाची नोंद झाली. वाशीम येथे 19 अंश इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. रविवारच्या तुलनेत शहरातील तापमानात 1.3 अंशांची घसरण झाली. शहरातील तापमान हे सरासरी किमान तापमानापेक्षा 4.2 अंशांनी कमी होते. पुढील दोन दिवस शहरात अल्हाददायक थंडी असेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. परंतु, थोडेफार ढगाळ वातावरण असल्याने तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)

 

विदर्भात पावसाचा अंदाज
विदर्भात 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी पावसाचा (Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसली तरी देखील थोडेफार ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दिवाळीनंतर विदर्भातील वातावरण पूर्णपणे कोरडे राहील व तापमानात घसरण होऊन थंडीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Weather)

 

Web Title :- Maharashtra Weather | signs of cold in maharashtra jalgaon and nagpur temperature dropped rain in some places of vidarbha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 52 वर्षाच्या शिक्षकानं 15 वर्षीय मुलीला नेलं टेरेसवर, बलात्कार करून अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस

Pune News | जनजन दिवाळी ! दिवाळी जनसामान्यांची काँग्रेस पक्षाच्या उपक्रमास प्रारंभ – माजी आमदार मोहन जोशी

Bhusaval-Daund Train | भुसावळ-दौंड मेमू साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय