Maharashtra Weather | राज्यात पुन्हा हुडहुडी ! आगामी 2 दिवसात थंडीचा कडाका – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather | अवकाळी पावसामुळे (Rains) पारा घसरल्याने नागरिकांना कडाक्याची थंडी सोसावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका (Maharashtra Weather) वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे थंडगार वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, आगामी दोन दिवसात उत्तर, मध्य महाराष्ट्रसह (North, Central Maharashtra) मराठवाड्यातील (Marathwada) काही भागात थंडी कायम असणार आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे. आगामी दोन दिवसांमध्ये थंडीची (Cold) हुडहुडी वाढणार आहे.

 

सर्वत्र रात्रीच्या किमान तापमानात (Temperature) झपाट्याने घट होऊन ते सरासरीखाली आल्याने गारठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पहाटे सह दिवसभर हुडहुडी जाणवत आहे. राज्यभरातील सर्वच थंड हवेच्या ठिकाणी बोचरी थंडी पडली आहे. उत्तर भारतात (North India) थंडीची लाट आली आहे. दरम्यान काही ठिकाणी बर्फवृष्टीही होत असल्याने उत्तरेकडून महाराष्ट्राच्या (Maharashra) दिशेने गार वारा सुटला आहे. परिणामी महाराष्ट्र आणि मुंबईतील किमान तापमान जादा घसरले आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai) थंडीची लाट कायम आहे. (Maharashtra Weather)

दरम्यान, मागील 24 तासांमध्ये थंडीचा पारा घसरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान, अनेक प्रदेशातील नागरिकांना या मोसमातील सर्वात कडक थंडीचा अनुभव मिळतो आहे. दरम्यान आगामी 3 ते 4 दिवस थंडीचा कडाका कायम असणार आहे. असं हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Weather | upcoming two days maharashtra cold wave for 2 days says imd

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा