Maharashtra Weather Update | राज्यातील ‘या’ जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | गेल्या अनेक दिवसंपासून राज्यात उन्हाचा चटका (Maharashtra Weather Update) लागला आहे. वाढत्या तापमानामुळे (Temperature) माणसाच्या जीवाची काहिली होत आहे. सध्या राज्यात तापमानाचा पारा वाढतच आहे. मागील काही दिवसामध्ये वाढणा-या तापमानामुळे लोक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यापाठोपाठ (Marathwada) आता मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) अनेक ठिकाणी तापमानामध्ये वाढ झाली आहे. (Maharashtra Heat Wave)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार Indian Meteorological Department (IMD) एकीकडे उन्हाचा चटका वाढला असला तरी आगामी तीन दिवस तापमानाचा पारा वाढलेलाच राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), चंद्रपूर (Chandrapur), (यवतमाळ Yavatmal), अकोला (Akola), वाशिम (Washim) या जिल्ह्यामध्ये आगामी तीन दिवस हवामान विभागाकडून यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला जिल्ह्यांतही तापमानाचा पारा 44 अंशांपुढे होता. मराठवाड्यात औरंगाबादमध्ये 40 अंशांपुढे, तर परभणी आणि नांदेड या ठिकाणी 41 अंशांपुढे तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ 10 आणि 11 मे या दिवशी तीव्र स्वरूप घेणार आहे. या कालावधीत राज्यात काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकणात 10 ते 12 मे दरम्यान, तर पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती, हवामान विभागाने दिली.

Web Title :- Maharashtra Weather Update | heat wave and rain imd
alert heat wave in these districts maharashtra marathwada and vidarbha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा