Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या झळा; IMD चा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात उन्हाचा (Maharashtra Weather Update) चटका कायम आहे. दररोजच्या वाढत्या तापमानामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाडा (Marathwada) या ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळते त्या भागातील तापमान 40 अंशावर आहे. उन्हाच्या जाळ्यात सापडलेल्या नागपूर शहरात आता अनेक भागात पावसाच्या (Rain In Maharashtra) हलक्या सरी बरसल्या. 40 अंशावरील तापमान आणि उन्हाच्या तीव्र झळा (Intense Heat Wave) जाणवत असताना संध्याकाळी वातावरणात बदल झाला. अशी माहिती हवामान खात्याने India Meteorological Department (IMD) दिली.

 

मागील अनेक दिवसांपासून नागपूरात (Nagpur) तापमान अधिक होते. उन्हाच्या झळा वाढल्या होत्या. मात्र अनेक दिवसातून या ठिकाणी पाऊस बरसला आहे. हलका पाऊस पडल्याने आज मात्र उन्हाचा चटका पुन्हा सोसावा लागणार आहे. त्याचबरोबर अमरावती (Amravati) शहरात देखील सेम वातावरण आहे. त्या भागातील नेरपिंगळाई परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. (Maharashtra Weather Update)

अमरावतीमध्ये अनेक भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.
दुपारी मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
असं असलं तरी अमरावतीमध्ये आगामी दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही (IMD) केलं आहे.

 

दरम्यान, भंडारा आणि वाशिम जिल्ह्यात (Bhandara And Washim) पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
त्याचबरोबर त्याठिकाणी वादळी वा-यासह वीज कोसळली आहे.
यामुळे काही जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत.
पावसाच्या सरीमुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ऐन काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
उन्हाळी सोयाबीन, मुग, भुईमूग या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Weather Update | heat wave in 2 district of the maharashtra next 2 days alert from india meteorological department (IMD)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

  1. Heart Health Tips | हृदयरुग्णांसाठी घातक ठरू शकते उष्णता, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा
  2. Uncleaned Teeth Risk | दात स्वच्छ न केल्याने हृदय-मनोविकारांनाही निर्माण होतो धोका; जाणून घ्या
  3. Mango Panna Benefits | उन्हाळ्यात कैरीच्या पन्हे प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे