Maharashtra Weather Update | महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाच्या सरी; उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | देशाच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर काही भागात उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biporjoy Cyclone) गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात प्रचंड बदल झाला आहे. महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली (Delhi), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), हरियाणासह (Haryana) देशातील बहुतांश भागात पावसामुळे (Rain) आल्हाददायक वातावरण आहे. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department-IMD) माहितीनुसार, अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस (Maharashtra Weather Update) सुरु आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीत पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. तर, महाराष्ट्राच्या काही भागातही पाऊस हजेरी लावणार आहे. आज (शनिवार) मुंबई (Mumbai), कोकणासह (Konkan) मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), मराठवाड्यात (Marathwada) तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उकाडा कायम आहे.
दरम्यान, उत्तर आणि पूर्व भारतात (North And East India) मात्र नागरिकांना उन्हाचा तडाखा बसत आहे. गुजरातला बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, हा पाऊस अधून-मधून उसंत घेतानाही पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे राजस्थानमध्ये (Rajasthan) वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे.

Web Title :  Maharashtra Weather Update | imd weather update maharashtra heatwave in up bihar jharkhand delhi ncr rajasthan get rainfall

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 2000 रुपये लाच घेताना येवला पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीकाला एसीबीकडून अटक

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या

ACB Trap News | सावकारी लायसन्सच्या कामासाठी 50 हजार रुपये लाच मागणारा वेल्हे सहाय्यक निबंधक कार्यालयातील लिपीक एसीबीच्या जाळ्यात