Maharashtra Weather Update | मॉन्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात 16 जूनपर्यंत पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमान (Temperature in Maharashtra) अधिक वाढले आहे. विदर्भात (Vidarbha) तर पारा अगदी चाळीशी पार गेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमान भयंकर वाढले आहे. गरमीपासून दिलासा मिळण्यासाठी लोकांना आता पावसाची आतुरता आहे. मात्र महाराष्ट्रात पाऊस (Maharashtra Weather Update) 16 जूननंतर दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार, अनुकूल वातावरण नसल्यामुळे मोसमी वाऱ्यांच्या हालचाली थंडावल्या आहेत. त्यामुळे केरळमध्ये पाऊस येण्यास आणखी विलंब होत आहे. अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘बिपोर्जॉय’ चक्रीवादळाच्या (Bipojoy Cyclone) दिशेवर मान्सून वाऱ्याची आगामी वाटचाल अवलंबून आहे. पण, अनुकूल वातावरण राहिल्यास 16 जून रोजी मान्सूनचे वारे राज्यात (Maharashtra Weather Update) दाखल होतील आणि 22 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात पसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/ANI/status/1666172338591891456?s=20

पोषक वातावरण नसल्यामुळे मान्सूनचे वारे अतिशय संथ गतीने वाहत आहेत. केरळमधील 14 हवामान केंद्रांपैकी 7 स्थानकांवर हलका पाऊस सुरू आहे. ढगांची घनताही वाढत आहे. केरळमध्ये मान्सून वाऱ्यांच्या हालचालीसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ लागले आहे. त्यामुळे मान्सूनचे वारे केरळमध्ये लवकरच दाखल होतील, असे हवामान तज्ज्ञ डॉ.अनुपम कश्यपी (Dr. Anupam Kashyapi) यांनी सांगितले.

Advt.

दरम्यान, ‘बिपोरजॉय’ची दिशा महत्त्वाची आहे. हे वादळ मुंबईपासून सुमारे 1000 किमी अंतरावर समुद्रात
निर्माण होणार आहे. सध्याच्या परिस्थितिनुसार ते पश्चिमेकडे झुकण्याची शक्यता आहे.
मात्र, चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे सरकल्यास संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस होईल.
त्याचा फायदा झाल्याने मोसमी वाऱ्यांचा वेग वाढण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे चक्रीवादळाच्या दिशेवर हवामान खाते बारीक लक्ष ठेवून आहे.

Web Title :   Maharashtra Weather Update | maharashtra weather forecast imd predicts rains to arrive after june 15 in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News |   कोर्टाच्या आदेशानुसार जन्माची नोंद करण्यासाठी 1400 रुपये लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

SSC-HSC Supplementary Exam-2023 | 10 वी-12 वीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार