Maharashtra Weather Update | राज्यात वाढला उन्हाचा चटका ! आगामी 2 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | मागील एक महिन्यापासून राज्यात उन्हाचा कडाका लागला आहे. वाढत्या तापमानामुळे (Temperature) माणसांच्या जीवाची काहिली होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. आज (शनिवार) देखील अनेक ठिकाणी उष्णतेच्या तीव्र झळा लागताना दिसत आहे. शनिवार आणि रविवार यादिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) उष्णतेच्या लाटेचा अंदाज पाहता ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. 2 मेपासून मुंबईसह (Mumbai) अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ आकाश राहील आणि हलका पाऊस (Rain) पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update)

 

काल (शुक्रवारी) महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये (Chandrapur) सर्वाधिक उष्णता होती.
यावेळी कमाल तापमान 46.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
तसेच, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार (Maharashtra Weather Update) बहुतांश शहरात समाधानकारक ते मध्यम श्रेणीत उष्मा नोंदवला जात आहे.
दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांत हवामानात बदल झाले आहेत. असं हवामान खात्याने (IMD) सांगितलं आहे.

दरम्यान, शनिवारी मुंबईत (Mumbai) कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
आकाशात हलके ढग असतील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 110 वर नोंदवला गेला.
पुण्यात (Pune) कमाल तापमान 40 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
येथेही दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 120 वर नोंदवला गेला आहे.
तसेच, नागपूर (Nagpur) 45 – 29 अंश सेल्सिअस, नाशिक (Nashik) 40 – 24 अंश सेल्सिअस, औरंगाबाद (Aurangabad) 41 – 25 अंश सेल्सिअस राहणार आहे.
दरम्यान, 2 मेपासून मुंबईसह अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ आकाश राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Weather Update | maharashtra weather forecast today weather and pollution report of maharashtra mumbai pune nagpur nashik aurangabad

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा