Maharashtra Weather Update | मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम; किती दिवस असणार उन्हाचा तडाखा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा चटका (Maharashtra Weather Update) लागला आहे. वाढत्या तापमानामुळे माणसाच्या जीवाची काहिली होत आहे. विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यात (Marathwada) तर उन्हाने पातळी ओलांडली आहे. काही शहरात तापमानाचा (Temperature) पारा 45 अंशावर पोहोचला आहे. आणखी काही दिवस उन्हाचा चटका कायम असणार आहे. तसेच, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. याबाबत माहिती भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) दिली आहे.

 

मुंबईत (Mumbai) देखील उन्हाचा तडाखा लागला आहे. उष्ण आणि कोरड्या वार्‍यांमूळे मुंबईचे वातावरण आणखीन बिकट झाले आहे. तसेच, दुसरीकडे पशु – पक्ष्यांचीही अवस्था दयनीय आहे. मुंबईमध्ये आज (मंगळवार) पारा 33 अंश सेल्सिअस इतका राहिला आहे. आगामी काही दिवस मुंबईमध्ये पारा 33 अथवा त्याहून जादा राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. (Maharashtra Weather Update)

 

दरम्यान, मुंबई बरोबर पुण्यात (Pune) 37 सेल्सिअस अंश, कोल्हापूर (Kolhapur) 40 अंश, तर सोलापूर (Solapur) 39 अंश आहे.
चंद्रपुरात (Chandrapur) मागच्या 4 दिवसांपासून तब्ब्ल 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
तर, आज 42 अंशावर तापमान आहे. मागच्या 100 वर्षांत ही दुसर्‍यांदा उच्चांकी नोंद असून 26 वर्षांनंतर इतका पारा चढला आहे.
याआधी 30 एप्रिल 1996 साली 46.6 सेल्सिअस तापमान नोंदविले होते. बाकी शहरात देखील पारा वाढताच आहे.

विदर्भ, पश्चिम राजस्थान आणि मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटा बाबत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.
यानंतर बाकी वायव्य भारत आणि मध्य भारतासाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला गेला आहे.
एप्रिल महिन्यात उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.
त्याचबरोबर आगामी 4 दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने (Indian Meteorological Department IMD) वर्तवली आहे.

 

Web Title :- Maharashtra Weather Update | maharashtra weather update mumbai pune temperature today imd alert

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा