Maharashtra Weather Update | ‘मान्सून गायब?’ महाराष्ट्रात मोसमी पावसाऐवजी उष्णतेची लाट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाची (Maharashtra Monsoon Updates) चर्चा महाराष्ट्रासह देशात पसरली होती. त्याचबरोबर अदंमानानंतर (Adman) मोसमी पाऊस केरळात (Kerala) देखील दाखल झाला असं भारतीय हवामान विभागानं Indian Meteorological Department (IMD) सांगितलं होतं. तेथून सरकत महाराष्ट्राच्या (Maharashtra Weather Update) वेशीवर येण्याची शक्यता असतानाच आता आणखी अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मोसमी पाऊस गायब झाला का? अशी चर्चा होताना दिसत आहे. एकीकडे पावसाची लगभग असतानाच आता उष्णतेची लाट (Heat Wave) आहे. त्यामुळे मोसमी पावसाला गती कधी मिळणार याकडे लक्ष लागून आहे.

 

पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील बहुतांश नागरिकांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. तसेच, नैऋत्य मोसमी पावसाच्या (Southwest Monsoon Rains) अरबी समुद्रातील शाखेच्या प्रवासास पोषक वातावरण नसल्याने त्याच्या महाराष्ट्रातील प्रवेशास अडथळा निर्माण झाला आहे. असं हवामान खात्याने सांगितलं आहे. (Maharashtra Weather Update)

या दरम्यान, मागील 3 दिवसांपासून मोसमी पाऊस कर्नाटक (Karnataka) सीमेलगत येऊन ठेपला आहे.
मोसमी पावसाच्या बंगालच्या उपसागरातील शाखा मात्र वेगाने प्रगती करत आहेत. काल (शुक्रवारी)
या भागात पूर्वोत्तर राज्यात प्रवेश करून पावसाने थेट हिमालयाच्या पायथ्यापर्यंत मजल मारली आहे.
त्याचबरोबर उत्तरेकडून येणाऱ्या कोरडया, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक भागात
सध्या उष्णतेची लाट असून, ती आणखी 2 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे.

 

Web Title :- Maharashtra Weather Update | monsoon journey stop by heat wave in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा