Maharashtra Weather Update | पुढील 4 दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मराठवाडा (Marathwada) आणि मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra) मान्सूनपूर्व पावसाचा (Maharashtra Weather Update) अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात (Vidarbha) पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat Wave Alert) देण्यात आला आहे. कोकणात (Konkan) मान्सूनच्या प्रगतीसाठी अजूनही अनुकूल परिस्थिती नसून 22 जूननंतर पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

 

बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) राजस्थानच्या (Rajasthan) अनेक भागांना धडकले आहे. या चक्रीवादळामुळे दुसरीकडे मान्सूनवर परिणाम झाला आहे. राजस्थानमधील पाचशेहून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वाळवंटात पूरस्थिती (Flood Situation) पाहायला मिळत आहे. विविध दुर्घटनांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पाली, सिरोही, राजसमंद, उदयपूर, बाडमेरमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. (Maharashtra Weather Update)

भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department-IMD) अंदाजानुसार, पुढील दोन दिवसात बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसाचा पावसाचा अंदाज (Rain forecast) वर्तवण्यात आला आहे. दिल्लीत (Delhi) हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी दिल्लीत 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर किमान तापमान 28.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. सामान्य तापमानापेक्षा एका अंशाने हे तापमान अधिक आहे. आयएमडीने दिल्लीत ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

 

 

 

Web Title :  Maharashtra Weather Update | monsoon rain in marathwada signs of heat wave for two days in vidarbha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा