Maharashtra Weather Update | दक्षिण कोकणात कोसळणार पावसाच्या सरी; ‘या’ 4 जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या पुण्यात काय स्थिती ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | गेल्या काही दिवसापासून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाची तीव्रता घटली आहे. दरम्यान देशाच्या पश्चिम किनारपट्टी आवारात अवकाळी पावसाचे (Untimely Rain) ढगाळ वातावरण झालं आहे. यामुळे दक्षिण कोकण (South Konkan) आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात (Maharashtra Weather Update) जोरदार पावसाच्या (Rain) सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आले आहे.

 

आज (शुक्रवार) सकाळपासूनच दक्षिण कोकण (South Konkan), दक्षिण मध्य महाराष्ट्र (South Central Maharashtra),
गोव्यातील (Goa) काही भाग आणि कर्नाटक (Karnataka) किनारपट्टी परिसरात ढगाळ हवामानाची नोंद झाली.
तसेच पुणे (Pune), सातारा (Satara), आणि मराठवाड्यातील (Marathwada) काही ठिकाणीही अवकाळी पावसाचे ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.
आज सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.
पुढील काही तासामध्ये याठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

 

याआधी काल (गुरुवारी) कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
त्याचबरोबर आज देखील महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता वर्तवल्याने शेतकरी (Farmers) राजा चिंतेत पडला आहे.
याशिवाय आज पुण्यासह रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या 7 जिल्ह्यातही तुरळक भागात पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून पुण्यात ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, उद्या (शनिवार) पासून महाराष्ट्रात पाऊस थंडावणार आहे. उद्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या 3 जिल्ह्यातच तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
बाकी ठिकाणी मात्र कोरडं हवामान राहणार आहे.
आज अकोल्यात पारा 42 अंश सेल्सिअसवर पोहोचला तर अमरावतीत 41.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title :- Maharashtra Weather Update | rainfall possible in south konkan imd give yellow alert to 4 district latest weather forecast

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा