Maharashtra Weather Update | राज्यात उन्हाचा चटका कायम ! विदर्भात 8, 9 मे रोजी उष्णतेच्या झळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात उन्हाचा चटका (Maharashtra Weather Update) वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे (Temperature) माणसांच्या जीवाची काहिली होत आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून वाढत्या तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर आहे. विदर्भात (Vidarbha) बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा 44 अंशाच्या (44 Degrees) आसपास आहे. या ठिकाणी 8 आणि 9 मे रोजी तुरळक भागामध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. आगामी 3 ते 4 दिवसांच्या कालावधीत तापमानाचा पारा काही प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) वर्तवली आहे.

 

देशातील बहुतांश भागात सध्या पावसाळी (Rain) स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा विचार करता विदर्भातील नागरीकांना उन्हाची झळ सोसावी लागत आहे. एप्रिल महिन्यात विदर्भामध्ये 45 ते 46 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद झाली होती. तसेच, मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रातही (North Maharashtra) 44 ते 45 अंशांपुढे तापमान गेले होते. राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशाच्या (Madhya Pradesh) बरोबरीने तापमानाची नोंद महाराष्ट्रात झाली होती. (Maharashtra Weather Update)

 

दरम्यान, आता उत्तरेकडील बहुतांश ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच तापमानात देखील वाढ सुरू आहे. मागील 4 ते 5 दिवसांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील तापमानात किंचित घट झाली आहे. दरम्यान अजुन काही ठिकाणी तापमान देशात उच्चांकी ठरत आहे. असं हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात येत आहे. उत्तर-पश्चिम भारतातील (Northwest India) तापमान सध्या कमी झाले असले, तरी त्यात 2 ते 3 अंशांनी वाढ होणार आहे. विदर्भातही 2 दिवसांत तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्याता आहे.

 

Web Title :- Maharashtra Weather Update | temperature may goes high in maharashtra heat will increase in vidarbha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा