Maharashtra Weather Update | राज्यात पुढील 8 दिवस थंडीचा जोर कायम; ‘या’ जिल्हांना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Weather Update | राज्यात मागच्या काही दिवसांपासून थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्याने हि थंडी वाढली आहे. राज्यातील जवळपास 20 च्या वर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पारा 15 अंशाच्या खाली आला आहे. हा थंडीचा जोर पुढील 8 दिवस असाच राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

मागच्या चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई तसेच कोकणात थंडी वाढली आहे. विदर्भ व उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत तसेच परभणी, गोंदिया, अकोला, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतही थंडीचा कडका कायम आहे. राज्यातील बहुतांश शहरांत सकाळी दाट धुके पडणार आहे. तसेच पुढील आठ ते दहा दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

 

हि थंडी काही पिकांसाठी फायदेशीर ठरत आहे. गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी हि थंडी फायदेशीर ठरत आहे.
जर हि थंडी अशीच कायम राहिली तर यंदाच्या वर्षी गव्हाचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमधील हवामानाचा अंदाज पहिला तर जळगाव शहराचे तापमान 7.5 अंशांवर पोहोचले आहे.
पुण्यातील किमान तापमान 8.1 अंश सेल्सिअस आहे. गोंदिया, नाशिक, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी 5 ते 6 अंश
सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
तसेच पुढच्या दोन ते तीन दिवसानंतर पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे.

Web Title :- Maharashtra Weather Update | weather update cold wave for the next 8 days the cold will increase even more in mumbai and pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड अडीच तास चर्चा, प्रकाश आंबेडकर ठाकरे गटाला धक्का देणार?

Pune Crime News | वीजेचा धक्का लागून मुलाच्या मृत्यु प्रकरणी महावितरणच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

Yerwada Jail Exhibition | कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ‘ई-मार्केटप्लेस’वर, कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांची माहिती